सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाच्यावतीने मुलांना मिष्ठान्न भोजन
नगर – समाजातील वंचित घटकांच्या उन्नत्तीसाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत राहून त्यांचा विकास साधण्याचे काम करत आहे. अशा संस्थेना प्रत्येकाने मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यातीलच सावली संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचे संगोपन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. अशा मुलांचा आधारवड बनून काम करत आहे. अशा संस्थेस सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाच्यावतीने मदतीचा हात देत, आपला आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. संघाच्या सदस्यांच्या वाढदिवस या मुलांमध्ये साजरा करुन आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करुन घेतल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले.
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाच्यावतीने 1 जून सभासदांच्या वाढदिवसानिमित्त केडगांव येथील सावली सोसायटीतील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ जगताप, कार्यकारी मंडल सदस्य प्रभाकर खणकर, शंकर बोरुडे, जयसिंग कारखिले, बाबूराव चन्ने, सावलीचे नितेश बनसोडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नितीन बनसोडे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने सावली संस्थेत राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अशाप्रकार इतरही संस्था संघटनांनी संस्थेच्या कार्यात सहभाग देऊन या मुलांचा मायेचा आधार द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी सचिव रोहिदास कांबळे यांनी संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन आढावा सादर केला. उपाध्यक्ष एकनाथ जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.