सोनोशी नियोजित नालंदा बुद्ध विहारास बाबासाहेब जाधव यांच्याकडून आर्थिक दान

0

बुलडाणा,(प्रतिनिधी)- मातृतिर्थ सिंदखेडराजा  तालुक्यातील ग्राम सोनोशी येथील नियोजित नालंदा बुद्ध विहारास एसटी महामंडळ  कास्ट्राईब संघटनेचे मा. राज्य उपाध्यक्ष तथा शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी आपली जन्मभूमी सोनोशी येथील निर्माणाधीन बुद्ध विहारस ८ जून २०२४ रोजी भेट दिली असता अपूर्ण असलेल्या नालंदा बुध्द विहारास शुध्द निर्मळ विचारांनी अन्तकरणातून तथागथांचे विचारांचे व महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे प्रसार प्रचार व्हावा व धम्मांस बळकटी यावी समाज परिवर्तन व्हावे या पवित्र अशा हेतूनी ते १९८८ पासून ते आज पर्यंत त्यांचे आर्थिक किंवा वस्तूच्या रूपात धार्मिक स्थळांना, गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यातून मदत, वाचनालयाला पुस्तके, अंध अपंग निराधार यांना अन्नदान वाटप करीत असतात. 

  ह्या दानसूर बाबासाहेब जाधव त्यांनी सोनोशी येथील नविन बाधकाम सुरू असलेल्या नालंदा विहारास नारायण साहादू शिंदे मा. तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सि. राजा तथा नालंदा बुध्द विहार सोनोशी कमीटीचे अध्यक्ष यांचे कडे पाच हजार रूपये बुध्द विहार बांधकामासाठी दिले व वाचनालयास दर महीण्याचे पेपरचे बील देण्याचे कबूल केले यावेळी खालील मान्यवर श्रीकांत देवराव हिवाळे, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी, रविंद्र म्हसाजी शिंदे उपसरपंच सोनोशी, अनिल भगवान कंकाळ एपीआय मुकुंद वाडी पोलीस स्टेशन संभाजी नगर (औरंगाबाद), राजू देवराव हिवाळे गटसचिव मोताळा ग्रामसेवा सहकारी सोसायटी, हनमंत सारंगधर रंधवे, युवानेते संतोष बळीराम मोरे, संजय राठोड, पाडूरंग बाला राठोड,राजू पिराजी राठोड पिंपरखेड, भगवान मोरे,भरत रंधवे, महेंद्र मोरे, मधूकर शिंदे इत्यादी उपासक उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here