जामखेड तालुका प्रतिनिधी – परभणी घटनेतील आरोपीस कठोर शासन करून कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे असे निवेदन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या वतीने देण्यात आले.
परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाची एका माथेफिरूने दि. १० डिसेंबर रोजी तोडफोड करून निंदनीय कृत्य केले व तमाम महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या जनतेचा अपमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यात आले .पोलिसांनी निरपराध भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले.कोंबिग ऑपरेशन करून अन्याय केला कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरूणाचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावा असे सुनील साळवे यांनी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले की,मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबास पंचवीस लाखाची मदत मिळावी,परभणी घटनेतील आरोपी वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा,खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कडक शासन व्हावे अशी त्यांनी मागणी केली.जामखेड चे तहसीलदार गणेश माळी,जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आर.पी.आय.चे वतीने निवेदन देण्यात आले.सदर परभणी येथील घटनेचा आर.पी.आय. आठवले पक्षाच्या वतीने जामखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निषेध नोंदविला.
यावेळी आरपीआय.चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, आधुनिक लहुजी सेनाचे जि.कार्याध्यक्ष पोपट फुले, बाळासाहेब शिंदे,शिवाजी साळवे,सतीश साळवे,सुनील सकट,रवी सदाफुले, ॲड.अक्षय साळवे,अंकुश गायकवाड,युवराज गायकवाड, राम साळवे,महादेव महारणवर,उत्कर्ष भालेराव,गौतम मोरे,सागर घायतडक, विनोद समुद्र,काशिनाथ सदाफुले,बापू जावळे,सागर चव्हाण,भीमा शिंदे,संदीप मोरे,रवी चौधरी,अभिजित साळवे,आदर्श साळवे,मिलिंद साळवे, छबू गायकवाड,सूर्यकांत सदाफुले,राजू साठे,सुभाष राजगुरू,अशोक साठे,विजय पुलावळे आदी बहुसंख्येने जामखेड तालुक्यातील रिपाई कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.