सोलापूर दि.31 :- 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहा राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली आहे.
महसूल सप्ताहामध्ये दि. 30 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत मेडीटेशन यावर मेडिटेशन सेंटरचे रामचंद्र मिशन हे मार्गदर्शन करणार आहेत. दि 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत वैद्यकीय तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी 4.30 वाजता “व्यसनाधीनतेपासून मुक्ती” या विषयावर डॉ.थडसरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी श्री शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5.00 यावेळेत उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी सत्कार व प्रशस्तीपत्र वाटप व सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत, महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी मनोरंजनपर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सांगितले आहे.