पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वररंग-२०२३ स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे शहरातील ५५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रयत शिक्षण संस्थेचे, S M Joshi College Hadapsar Pune एस. एम. जोशी कॉलेजमधील ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘स्वररंग-२०२३ स्पर्धे’त सर्वाधिक पारितोषिके मिळविणारे महाविद्यालय म्हणून देण्यात येणारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजला देण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविण्याचा मान एस. एम. जोशी कॉलेजने मिळविला आह़े.
‘स्वररंग-२०२३ स्पर्धे’मध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिके मिळवून कॉलेजच्या नावात मानाचा तुरा रोवला आह़े. शिवानी वाघ (वेस्टन सोलो गीत), ऋतुजा भाडळे (एकपात्री प्रयोग) आणि शुभम शेंडे (वक्तृत्व स्पर्धा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच वेस्टर्न सोलो गीत प्रथम क्रमांक, पाश्चात्य समूह गीत प्रथम क्रमांक, लोक नृत्य प्रथम क्रमांक, मोनॅक्ट प्रथम क्रमांक, एकांकिका नाटक प्रथम क्रमांक, स्किट प्रथम क्रमांक, माइम प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, फोक ऑर्केस्ट्रा द्वितीय क्रमांक, भारतीय समूह गीत द्वितीय क्रमांक इतर प्रकारात पारितोषिके मिळविली आहेत.
‘स्वररंग-२०२३ या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. विद्यार्थ्यांच्या या यशात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे, डॉ.नम्रता कदम, डॉ.अर्चना पाटील, प्रा.माधुरी एकशिंगे, प्रा.दीप्ती शेळके, डॉ.अतुल चौरे, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्रो.डॉ.एकनाथ मुंढे, ऑफिस प्रमुख शेखर परदेशी, पांडुरंग मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, कार्यालयीन सेवक व शिक्षकेतर सेवकांचे सहकार्य मिळाले.