येवला:-प्रतिनिधी
उपसंचालक भुमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक व जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख नाशिक यांनी संपुर्ण जिल्ह्य़ात माहे जुन २०२४ मधील चौथा शनिवार दि. २२|०६|२०२४ या दिवशी स्वामित्व योजने अंतर्गत नगर भूमापन योजना लागू करण्यात आलेल्या गावातील मिळकतीचे सनद वाटप मोहीम राबविणेबाबत आदेशित केल्याने सदर आदेशानुसार येवला तालुक्यातील सोमठाणदेश, विसापूर, लौकी शिरस, धुळगाव, कानडी, पिंपरी, गुजरखेडे, जऊळके, मानोरी बु||, भाटगाव, महालखेडे चांदवड, निमगाव मढ, अंगुलगाव, बदापुर, बोकटे, गवंडगाव, कातरणी, अनकाई, तळवाडे, बाभुळगाव बु||,नेऊरगाव,देशमाने बु||, न्याहारखेडे बु||, पारेगाव व अंगणगाव या गावांना एक कर्मचारी एक गाव याप्रमाणे सनद वाटप व सनद वसुली मोहीम राबविणेचे नियोजन केले आहे .
सदर मोहिम राबविणेकामी उप अधीक्षक भूमी अभिलेख येवला यांनी गटविकास अधिकारी यांचे सहकार्याने ग्रामपंचायतीमार्फत संबधित गावात दवंडी देणेबाबत आदेशित केलेले आहे. गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन गावातील प्रमुख व्यक्तींना सनद वाटपाकामी आमंत्रित करुन १००% सनद फी वसुली करणेकामी सहकार्य करणेबाबत आवाहन केले आहे.
तरी सदर गावातील गावठाण हद्दीतील नगरभूमापन लागु झालेल्या मिळकतधारकांनी शनिवार दि.२२|०६|२०२४ रोजी सदर सनदेची नियमानुसार होणारी शासकिय फी भरुन सनद फी भरलेबाबतची रितसर पावती संबधित कर्मचारी यांचेकडून प्राप्त करुन घेऊन सहकार्य करावे . असे आवाहन भुमी अधीक्षक येवला कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे