* अनेक भक्तगणांनी घेतली उपासक दीक्षा
पैठण,दिं.९:स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज श्रीक्षेत्र नाणिजधाम प्रणित स्व-स्वरूप संप्रदाया तर्फे जगद्गुरूश्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम रविवार (दि.९) ऑक्टोबर रोजी सकाळी ९. वाजेपासुन हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मैदान, पैठण रोड या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्यात जवळजवळ पाच हजार भक्तगणांनी सांप्रदायची उपासक दीक्षा घेतली. या सोहळ्याच्या माध्यमातून संस्थांन तर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना म्हशींचे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन सचिन घायाळ, पं.स.सदस्य सोमनाथ जाधव, पीठ पदाधिकारी उदय रानभरे, गणेश मोरे, सुमित लंके, संजय गाडेकर, करकरे, जिल्हा निरिक्षक संदीप थोरात, जिल्हाध्यक्ष साहेबराव आहेर, तालुकाध्यक्ष छायाताई पांढरे, ता. सचिव आप्पासाहेब पठाडे यांच्यासह जिल्हा सेवा समिती, व पैठण तालुका सेवा समिती सह जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह पन्नास हजाराच्या आसपास भाविक उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी भेट दिली. चेअरमन सचिन घायाळ, व आ. अंबादास दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या या दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी ९. वाजता महासंतसंग, पालखी सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन, स्वागत आरती, गुरुपूजन, प्रवचन, पादुका दर्शन, उपासक दीक्षा, शेवटी पुष्पवृष्टी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास औरंगाबाद जिल्ह्यातील शिष्य, साधक, भक्तगण, हितचिंतक भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी भेट देवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.