हर घर तिरंगा अभियान : राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी पाठविण्याचे आवाहन  

0

सातारा दि. १३ –  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त संपूर्ण देशभर मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हर घर तिरंगा अभियान १३ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवून या अभियानात सहभाग घेतला. *तिरंग्यासोबतचा सेल्फी पाठवण्याचे आवाहन*  हर घर तिरंगा अभियानामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रीय सहभागी होत असताना  तिरंगा राष्ट्रध्वजासोबतचे छायाचित्र  harghartiranga.com या लिंक वर अपलोड करावे, असे आवाहन  प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

 भारतीय ध्वज संहितेच्या अधिन राहून राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकवायचा आहे. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे

*प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका*  *राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखा* 

दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, १ मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. 

   १५ ऑगस्ट २०२३ रोजी व त्यानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, शासकीय समित्या यांनीही  इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. त्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार  करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here