
हिंदू हृदयाचे सम्राट
आम्हां सदैवआधार
पटायला लागे सर्वां
आपले सुवर्णविचार
जसे मनी सुविचार
तसा सदैव आचार
आठवणी तयांच्या
होती सहज संस्कार
मिळे कधी तुरे हार
कधीकधी होय हार
प्रयास करती अपार
सेतुबंधनी जशीखार
चालू दावलेली वाट
समजून घेऊन सार
उतराई न उपकार
नमन तुम्हां त्रिवार
आदरणीय हिंदुत्व
झणझणीत पत्रकार
ऐकत रहावे भाषण
कानी घुमे टणकार
लेखणीअति देखणी
सार्थ व्यंगचित्रकार
मना मात्र व्यंग नाही
कार्मिक सामनाकार
शिवरायाचेअनुयायी
तुम्हां खरा अधिकार
पिढ्यापिढ्या गाजेलं
साहेबा तव जयकार
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.