जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या तर्फे खोपोली काँग्रेस कार्यालयात संगणक व प्रिंटर भेट.

0

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )

  महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यापासून ते तन मन धनाने काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे रायगड काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पक्षाचे कार्यालय उघडण्यासाठी लागणारी डिपॉझीट किंवा भाडे कार्यालयासाठी फर्निचर संगणक स्वतः देवून काँग्रेस कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम ते अहोरात्र करत आहेत.खोपोली शहर काँग्रेस कमिटीची मागणी होती कि कार्यालयात संगणक व प्रिंटर असेल तर आपण जनतेची कामे चांगल्याप्रकारे करू शकू. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी स्वखर्चाने खोपोली शहर काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष जॉन रिचर्ड यांना दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी संगणक व प्रिंटर सुपूर्द केला. यावेळी वैभव पाटील, सागर जाधव, उस्मान शेख हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here