फलटण प्रतिनिधी श्रीकृष्ण सातव
माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी 2.32 लाख रुपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरी सुविधा, जन सुविधा व क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी वरील प्रमाणे मंजुरीचे पत्र मिळाले आहे.
यामध्ये मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते, छोटे पूल , सुशोभीकरण अशा विकास कामांचा त्याचा समावेश आहे. त्यामध्ये कोळकी, भाडळी, मुंजवडी, विंसुरडी सरडे, सावंत वाडा, साखरवाडी, बीबी ,घाडगे मळा, हनुमंतवाडी, राजळे, सोनवडी, खुंटे, मुळीकवाडी,दऱ्याचीवाडी, ढवळ ,शहरीचीवाडी, तांबवे, खराडेवाडी, खामगाव, जिंती, परांदवाडी, निंबळक, वैजापूर, निंभोरे, धुळदेव, आदर्की खुर्द, काळज, चव्हाणवाडी, मठाचीवाडी, पिंपरद , सुरवडी, सांगवी, गुणवरे विडणी आधी गावांना विकास कामासाठी नेहमी उत्पन्न झाली असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.