माहूर :- माहूर पंचायत समितीच्या माजी सभापती अनिताताई विश्वनाथ कदम यांची भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या महिला आघाडीच्या माहूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते नांदेड येथील भव्य सोहळ्यात नियुक्ती पत्र देण्यात आले.
अनिताताई कदम ह्या महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष माहूर तालुक्याचे सहकार महर्षी नामदेवरावजी केशवे यांचे खंदे समर्थक आहेत. तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाची प्रदीर्घ सेवा केल्यामुळे पक्षाने महिला संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, आमदार अमर राजूरकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, विश्वनाथ कदम यांच्या सह जेष्ठ कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. निवडीबद्दल माहूर तालुका अध्यक्ष संजय राठोड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य राजेंद्र केशवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रसचे सचिव डॉ.निरंजन केशवे, शहर अध्यक्ष आनंद तुपदाळे, दत्तात्रय शेरेकर, किसन दामा राठोड, रहमत भाई यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
……………………………