बाजार समितीच्या संचालिका उषाताई शिंदे यांचे आवाहन
येवला प्रतिनिधी :
अद्याप कांदा पिकांची लागवड झालेली नसली तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांचा पिक विमा उतरून घ्यावा.यावर्षी निसर्गाने वक्र्द्रष्टी केली असून यापुढील काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे वेळेत विमा काढावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका उषाताई माणिकराव शिंदे यांनी केले आहे.
येवला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना तसेच शेतकरी बांधवांना संस्था व बँके मार्फत कांदा पिका करीता ब-याचशा सभासदांना कर्ज वितरण केलेले आहे.त्यांनी देखील
पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत शासनाने शेतक-यां करिता १ रुपयात पिक विमा उतरविण्याची योजना चालु केली आहे,त्यात सहभागी व्हावे असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.अजुन कांदा पिकाची लगवड झालेली नाही.तसेच कांदा पिकास भाव मिळत नसल्यांने शेतक-यांनी इतरही पिकांची लागवड केलेली आहे.संस्थेमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकरी सभासदांनी मका,बाजरी, कपाशी,सोयाबीन,मुग व इतरही पिकाची लागवड केली असेल,अशा पिकांचा विमा उतरावयाचा असेल त्यांनी ३१ जुलै पर्यंत संबधीत संस्थेशी अथवा बँकेशी संर्पक साधुन पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत शासनाच्या १ रुपयात पिक योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन सौ. शिंदे यांनी केले आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना काही शंका किंवा अडचण असल्यास आपल्या परिसरातील कृषी सहाय्यक तसेच कृषी अधिकाऱ्यांशीही संपर्क साधून माहिती मिळवावी व मुदतीत विमा उतरून घ्यावा असे आवाहन सौ.शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान,येवला सोसायटीच्या सभासदांना विम्याविषयी काही शंका असल्यास त्यांनी सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व सचिवानी केले आहे.