आमदार दराडे बंधूचा पाठपुरावा;रस्ते,पुल,जलसंधारणाची कामी मार्गी,२०० कोटींची कामे प्रास्तवित
येवला प्रतिनिधी
विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळे येवला मतदारसंघासह आपल्या कार्यक्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटींचे विकासकामे मंजूर झाली आहेत. तर आतापर्यंत रस्ते,पुल, बसस्थानक,जलसंधारणाची सुमारे १५० कोटींचे कामे पूर्णत्वास गेली असून अजूनही २०० कोटींची कामे प्रास्तवित आहेत.या कामासह येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेटवर उड्डाणपुलासह राजापूर ४१ गाव पाणीयोजनेसाठी शासनाने लवकरच निधी देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी दोन्ही आमदारांचा पाठपुरावा सुरु असून या कामामुळे मतदारसंघातील जनतेचे अनेक वर्षापासूनचे प्रश्न मार्गी लागल्याचा विश्वास आमदार नरेंद्र दराडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री दादाजी भुसे आदींनी नेहमीच सहकार्य केल्याने जवळपास सर्वच कामांना निधी मिळत असल्याचे दराडे यांनी सांगितले.शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाहत वाढून शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्यामुळे नववसाहती व शहरातील विविध भागांसाठी आमदार दराडे बंधूंच्या प्रयत्नाने ३० कोटी रुपयांच्या निधीच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले असून अजूनही २० कोटीची कामे होणार आहेत.यामध्ये देसाई ड्रीम सिटी परिसरातील रस्ते व शहरातील गल्लीबोळांमधील रस्त्यांसाठी तीन कोटी,पारेगाव रोड बाजीराव नगर मोरे वस्ती भागासाठी सव्वा दोन कोटी,कलावती आई मंदिर परिसरातील रस्त्यांसाठी दोन कोटी,संभाजीनगर भागातील रस्त्यांसाठी दोन कोटी,सुलभानगर परिसर व डॉ. मुंडे परिसरासाठी दोन कोटी,ताज पार्क भागामध्ये रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी दोन कोटी,पद्मावती कॉलनी भागांमधील रस्ते बनवण्यासाठी दीड कोटी,मनोज दिवटे यांच्या घरपरिसरातील रस्त्यांसाठी दीड कोटी रुपये निधी मिळाला आहे. त्याचप्रमाणे नव्याने होत असलेल्या तात्या टोपे स्मारकांच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये,६० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दीड कोटी,निलेश पटेल यांच्या घरापर्यंत रस्त्यासाठी दीड कोटी,स्टेट बँक ते देवीच्या खुंट रस्त्यासाठी दीड कोटी रुपये तसेच शहरातील नववसाहती मधील रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधीला मंजुरी मिळालेली असून सदरील कामे लवकरच सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येवला-गोलेवाडी-नगरसुल-पिंपळखुटे रस्त्यासाठी सहा कोटी, येवला-वडगाव बल्ले-गोलेवाडी-सायगाव-रहाडी रस्त्यासाठी पाच कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.येवला-लासलगाव मतदारसंघातील ९० गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आठ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आत्तापर्यंत २५ कोटी रुपयांचे कामे पूर्णत्वाकडे जात असून अनेक नवीन कामांना मंजुरी मिळालेली आहे.सावरगाव येथील बंधारा दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर काम महामंडळाकडे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीच्या परिसरातील विकासकामांसाठी १५ कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रास्तावित केल्याने लवकरच तीही कामे सुरू होतील.त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत दोन कोटी ८० लाख रुपयांच्या कामांची स्थगिती उठवणे व नवीन ९ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या येवला-नांदगाव राज्य महामार्गावर वडगाव गेट येथे रेल्वे विभाग व शासनाच्या वतीने लवकरच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवल्याने ५० कोटी रुपयांचा निधी अंदाजे प्रस्तावित केलेला आहे.
जलसंधारण विभागांतर्गत साडेसहा कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती लवकरच उठणार असून तापी खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी नवीन सिमेंट प्लग बंधारे व जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी प्रास्तावित करण्यात आलेला असून लवकरच मंजुरी मिळेल. अल्पसंख्यांक क्षेत्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी अल्पसंख्यांक बहुल गावांसाठी प्रस्तावित आहे. जनसुविधा योजनेअंतर्गत यावर्षी सव्वा कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.क्रीडा विभागाअंतर्गतल्या व्यायाम शाळा बांधकाम,कंपाऊंड व साहित्यासाठी यावर्षी एक कोटी २० लाख रुपयांचा निधी येवला-लासलगाव मतदारसंघासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागांतर्गत डोंगरगाव तलाव,कालव्याची देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी,डोंगरगाव धरणातून होणारी गळती शोधण्यासाठी बुडीत क्षेत्रात विंधन विहरीचे काम करणे व गळती प्रतिबंधक करण्यासाठी २० लाख,पालखेड डावा कालव्याच्या वितरिका ४६,४७,४८,४९,५०,५१,व ५२ यांची देखभाल व दुरुस्तीसाठी १५ कोटी,खिर्डीसाठे लपा तलाव कालव्याची देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी,पालखेड डाव्या कालव्यावरील रस्ता १५ पूल दुरूस्तीसाठी १० कोटीची कामे प्रस्तावित केलेली असून लवकरच सदर कामांनाही चालना मिळणार आहे.
तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरत असलेली ४१ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम मजूर झाले असून आता निधी मिळवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा चालवला आहे.आम्ही दोघे भाऊ आमदार झाल्यानंतर प्रत्यक्षपणे गावागावातील ठराव जमा करणे, गावागावातील संपूर्ण कागद पंचायत समितीच्या माध्यमातून जमा करून स्वतः त्याबाबतचा सर्वे करून सदरील योजना सुरू होत असल्यामुळे निश्चितपणे केलेल्या कामाचा समाधान आहे.यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही पाठपुरावा केला आहे.
मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी विविध ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभाग अंतर्गत नवीन शाळा खोल्या,शाळा दुरुस्ती,आरोग्य केंद्र,वैद्यकीय निवासस्थान,ग्रामीण भागातील रस्ते परिसरातील सुधारणा यासारखी कोट्यावधी रुपयाचे विकासकामी तालुक्यात मार्गी लागत असल्याचा समाधान आहे.
आम्ही अतिशय गरिबीतून पुढे येत व शून्यातून उभे राहत जनतेची सेवा करतोय.येवलेकर जनतेच्या प्रेमामुळे आम्हाला राजकारण,समाजकारण,शिक्षण,आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर आम्ही दोघा भावांनी तालुक्यासाठी भरीवविकासासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला लवकरच भविष्यामध्ये अतिशय मोठी मोठी काम शेकडो कोटी रुपयांची प्रस्तावित असून त्यांनाही लवकरच चालना मिळेल अशी अपेक्षा आमदार दराडे यांनी व्यक्त केली.