आठ दिवसात वाकी येथील पेजल योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होणार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील वाकी येथील पेजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी पंचायत समिती जामखेड या ठिकाणी मंगळवार दि.३ जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे हे जामखेड तालुक्यातील कार्कर्त्यांसमवेत पंचायत समिती जामखेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते . यासंदर्भात गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दखल घेऊन आठ दिवसात वाकी गावातील दलित वस्ती सह चार वस्त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिल्याने आरपीआयचे उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती.या कामाची विस्तार अधिकारी बी.के माने,शाखा अभियंता जी. एस.भोसले ,उपअभियंता माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्याचा सविस्तर अहवाल पंचायत समिती जामखेड यांना सादर केला.तेव्हा दि. ३ जानेवारी रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी योजनेतील त्रुटी दूर करून आठ दिवसात वाकी गावासह दलितवस्तीचा पेजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे उपोषण आठ दिवसासाठी स्थगित घेण्यात आले आहे.
यावेळी आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिवाजी साळवे,सुजित धनवे,महिला आघाडी जामखेड रुक्साना पठाण,बापू जावळे,युवराज गायकवाड, कार्याध्यक्ष खंडू मोरे,आदी आर.पी.आय.चे कार्यकर्ते उपस्थित होते