उरण शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी  चेतन म्हात्रे यांची निवड.

0

माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट.

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे ) : गुरुवार दिनाकं 26 जानेवारी 2023 रोजी उरण शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली यामध्ये युवा कट्टर शिवसैनिक चेतन म्हात्रे यांची 2023 साठी अध्यक्षपदी एकमताने  निवड करण्यात आली आहे.यानंतर  नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन म्हात्रे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली. कडवट व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून परिचित असलेले चेतन म्हात्रे हे  शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याचा सहभाग असतो. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन म्हात्रे यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदर वेळी गटनेते  गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका संपर्कप्रमुख धीरज बुंदे,अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, कामगार नेते गणेश घरत, उपविभागप्रमुख रवी पाटील, मावळते अध्यक्ष निखिल पाटील, शाखाप्रमुख नितीन सावंत,दिनेश घरत,जेष्ठ कार्यकर्ते  माळी, गडकरी, मनोहर घरत, धीरज बुंदे, शांताराम भोईर व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here