छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

0

पुणे :-‘छगन भुजबळ यांचा निषेध असो’ , भुजबळाचा बैलाला घो.. , ‘बेईमान बेईमान ..छगन बेईमान’अशा घोषणांनी संपूर्ण शनिपार परिसरात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि माजी महापौर अंकुश काकडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शेने करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,’छगन भुजबळ नावाच्या व्यक्तीला कित्येक वेळा राजकीय अडचणीच्या काळात लोकनेते शरद पवार यांनी मदतीचा हात दिला,त्यांचे पुनर्वसन केले, त्यांना मंत्री केले , त्यांच्या पुतण्याला खासदार केले, अशी मेहेरबानी दाखवली असताना देखील छगन भुजबळ यांनी वाचाळगिरी करत आपण किती चांगल्या स्वरूपाचे गद्दार आहोत, याचे प्रदर्शन काल बीड येथे झालेल्या जाहीर सभेत केले. चार वर्षांपूर्वी जेव्हा छगन भुजबळ यांना जेलमध्ये असह्य वेदना होत होत्या, त्यावेळी आदरणीय शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करत छगन भुजबळ यांचा जामीन करून घेतला होता. परंतु छगन भुजबळ यांनी या सर्व गोष्टी विसरून राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे. भविष्यकाळात जर पुन्हा छगन भुजबळ यांनी साहेबांबद्दल अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा योग्य समाचार घेणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अंकुश काकडे,मृणालिनी वाणी,गणेश नलावडे,,सुषमा सातपुते,दिपक जगताप,भूषण बधे ,सारिका पारेख,अप्पा जाधव,पायल चव्हाण,राजेंद्र आलमखाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

One attachment • Scanned by Gmail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here