छगन भुजबळ यांनी संभाजी पवार यांना दिलेला शब्द पाळला

0

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुक

येवला प्रतिनिधी 

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर सविता पवार तर उपसभापती पदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एक एक वर्षाचा टर्म ठरला होता.त्यानुसार पहिल्या टर्ममध्ये सभापती पदासाठी भुजबळ गटाचे श्री किसनराव धनगे यांना संधी देण्यात आलेली होती तर उपसभापती पदासाठी संभाजी पवार गटाचे बापू गायकवाड यांना संधी देण्यात आलेली होती.

एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार भुजबळ गटाचे किसनराव धनगे यांनी राजीनामा दिला होता.त्यानंतर आज पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भुजबळ गटाच्या पाठिंब्याने संभाजी पवार गटाच्या श्रीमती सविता बाळासाहेब पवार या सभापती झाल्या तर उपसभापती पदावर भुजबळ गटाच्या  संध्या बापूराव पगारे यांना छगन भुजबळ यांनी संधी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here