दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने विजय गिरी आणि श्रीकांत गिरी यांचा सत्कार 

0

संगमनेर  : दशनाम गोसावी समाजाच्या विविध मान्यवरांना विविध संस्थेत चांगल्या पदावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने या सर्व मान्यवरांचा नुकताच सन्मान सत्कार करण्यात आला.

           संगमनेर तालुका दशनाम गोसावी संघटनेचे मार्गदर्शक, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आणि जोर्वेचे सुपुत्र विजय भागवत गिरी यांना सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमनपदाची संधी मिळाली आहे त्याचबरोबर त्यांचे धाकटे बंधू निवृत्त नायब तहसीलदार विनोद भागवत गिरी यांची सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी, श्रीकांत गिरी यांची अमृतवाहिनी बँकेच्या संचालकपदी, उल्हास गोसावी यांची धांदरफळ सोसायटीच्या चेअरमनपदी, रमेश गिरी  यांची भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल या सर्व दशनाम गोसावी समाजाच्या सुपुत्रांचा संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने संगमनेरच्या  शासकीय विश्रामगृह  येथे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष दशरथ बाळासाहेब गोसावी होते.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष भागवत शिवबाळ भारती, सचिव माधव पुरी,सहसचिव संतोष पुरी,खजिनदार प्रवीण गोसावी,सहखजिनदार निखिल गोसावी,कोषाध्यक्ष सोमनाथ बाळगीर गोसावी ,कार्याध्यक्ष चंदन गोसावी,संघटक पद्माकर गोसावी,सहसंघटक राजाराम गोसावी,प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ पुरी,समन्वयक लक्ष्मण भारती, निमंत्रित सदस्य अनिल पुरी, गणेश गोसावी, यमन गोसावी, रंजित गिरी, संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज समाधी बचाव संंटनेेचे तालुका अध्यक्ष मनोज गोसावी,उपाध्यक्ष सुनील गोसावी गोरक्षनाथ गोसावी,  जालिंदर गोसावी  प्रवीण रमेश गिरी हे यावेळी उपस्थित होते. सर्व समाज बांधवांनी सत्कारमूर्तींचा सत्कार करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here