निळा झेंडा आणि जयभीम चा नारा आता काँग्रेसनेही स्वीकारावा :राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया

0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिराला शिर्डीत सुरुवात :

शिर्डी – Rajesh Lilothiya

समस्त उपेक्षित, वंचित जनतेच्या जीवनाचे शिल्पकार ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बसपा किंवा इतर रिपब्लिकन पक्षाचे नसून काँग्रेस चे ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे दाखवायचे असेल तर आता काँग्रेसनेही ” निळा झेंडा स्वीकारून जयभिमचा नारा द्यावा ” अशी आग्रही मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी केली.

उपेक्षित, वंचित समाज आपल्या पासून दूर का गेला यांचा विचार काँग्रेस ने ही करावा असे सांगून काँग्रेस संघटन आणि उपेक्षित वंचित समाजात कुठे तरी गॅप पडला तो भरून काढावा कारण देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आणि अल्पसंख्यांक हे काँग्रेस पक्षाचे मुख्य मतदार आहेत ते कायम पक्षा सोबत राहिले पाहिजे असा आशावाद लिलोठीया यांनी व्यक्त केला. सिद्धार्थ हत्तीअंभीरे यांचे कार्यविषयीं बोलतांना राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतली असून देशात सर्वात चांगले काम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभीरे यांचे आहे त्यांनीच पहिल्यांदा परभणी ते दिक्षाभूमी अशी पाई धम्म यात्रा काढली याबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक सिद्धार्थ हत्ती अंभीरे यांनी केले अनुसूचित जातीच्या प्रश्नावर आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरू असे सांगून अनुसूचित जातीच्या योजना प्रभावी रित्या अमलबजावणी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली. सुरुवातीला खा. मुकुल वासनिक आणि राजेश लिलोठीया यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभीरे केले. संचलन पवनकुमार डोंगरे यांनी केले
कार्यक्रमला आ. लहू कानडे, माजी आमदार विजय खडसे, राजेश लाडे, ऍड. विजय साळवे, अश्विनी खोब्रागडे, संजय भोसले, बंटी यादव, गौतम गवई, सुजित यादव, प्रवीण सुरवाडे, कृष्णा भंडारे सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी महात्मा गांधी यांना अभिवादन करून रॅली काढण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here