पोलिस निरीक्षक मथुरे यांची सात दिवसांत होणार चौकशी

0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा,आमदार दराडेनी मांडली लक्षवेधी

येवला, प्रतिनिधी: एखाद्या अधिकाऱ्याने कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अवमान करणे गंभीर आहे.त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची सात दिवसात वरिष्ठामार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.

शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.

येवला येथे १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया सुरु असताना शहर पोलीस निरीक्षक श्री.मथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रगती पॅनल प्रमुख व इतरांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या घरी काही कारण नसताना पोलिसांना दोन तास बसवून ठेवले तसेच भाजपाचे नगरसेवक प्रमोद सस्कर यांनाही धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला.याशिवाय

आमदार दराडे यांना एकेरी भाषा वापरुन सदर ठिकाणाहून निघून जाण्याबाबत दम दिला व केंद्रावरच हुज्जत घातली.या निवडणुकीत विरोधी पॅनलला पाठिशी घातले.यामुळे शहरात पोलीस निरीक्षकांच्या विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.शहरात लोकप्रतिनिधीच जर अशा अधिकाऱ्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेला हे कसे संरक्षण देणार, अशी भावना असून लोकप्रतिनिधीचा अवमान केलेला असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी दराडे यांनी केली.

यावर फडणवीस यांनी सदरच्या अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधीच्या सोबत वागणे निश्चितच चुकीचे व गैर असून याबाबत मी स्वतः देखील गंभीर आहे.या अधिकाऱ्याची वरिष्ठामार्फत सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. 

श्री.दराडेनी निलंबनाचा आग्रह धरल्यावर फडणवीस म्हणाले की,अशा कारवाईत अधिकारी मॅट किंवा न्यायालयामार्फत स्थगिती मिळवतात.त्यामुळे चौकशी करूनच कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी मी स्वतःच गंभीर असल्याने असे प्रकार गैर असल्याचे फडणवीस म्हणाले.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदरच्या अधिकाऱ्याची पोलीस ठाण्याधून तत्काळ बदली करण्याची मागणी केली.यावरही फडणवीस यांनी चौकशीला अडथळा नको म्हणून त्यांची पोलीस ठाण्यातून त्वरित बदलीची घोषणा केली.आमदार नरेंद्र दराडे यांनीही यात लक्ष वेधत जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमप यांनी सर्व अवैध धंदे बंद केले असल्याचे कौतुक करत येवल्यातील धंदे कसे सुरू आहे?, या अधिकाऱ्याला कोणाचा पाठिंबा आहे याची चौकशीची मागणी केली.यावर फडणवीस यांनी त्यांना कोणाचा पाठिंबा आहे याचीही चौकशी करण्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here