उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे ) : बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांचे सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या कल्याणा साठी रात्रंदिवस झटत आहेत.गोरगरिबांसाठी त्यांनी अनेक लोकहित उपयोगी निर्णय घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे सुरु आहेत.विविध प्रश्न मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत.विविध समस्या सोडविण्यासाठी पक्षाने नेहमी प्राधान्य दिले असून उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या प्रश्न तसेच उलवे परिसराती समस्या प्राधान्याने सोडवू असे अभिवचन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख तथा कर्जत खालापूर विधानसभा मतदान संघाचे आ.महेंद्र थोरवे यांनी दिले.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उरण विधानसभा संघटक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे भूमीपुत्र भवन शेजारी बाबासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालयाचे उदघाटन आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.महेंद्र थोरवे यांनी उलवे येथील स्थानिक ग्रामस्थांवर,भूमीपुत्रांवर कसा अन्याय झाला हे सांगत उलवे मधील सर्व ग्रामस्थांचे,भूमीपुत्राचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उलवे मधील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू असे अभिवचन आ. महेंद्र थोरवे यांनी दिले. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यालयाचे उदघाटन व पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे उत्तम नियोजन केल्याने महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे कौतूक करत आभार देखील मानले.
मेळाव्या मध्ये उरण पनवेल तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्यांचे आ. महेंद्र थोरवे यांनी नियुक्ती पत्र, शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. उरण तालुक्यातील चिरनेर विभागीय प्रमुख पदी विजय पाटील, नवघर जिल्हा परिषद प्रमुखपदी राजेश ठाकूर,बामनडोंगरी गाव शाखा प्रमुख पदी अंनत गडकरी, मोहा कोळीवाडा शाखा प्रमुख पदी धनंजय कोळी, तरघर शाखा प्रमुख पदी संतोष मोकल, खारकोपर शाखा प्रमुख पदी सचिन देशमुख, उलवे संपर्क प्रमुख पदी राजेंद्र म्हात्रे, मोरावे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,उरण तालुक्यातील दिघोडे शाखा प्रमुख पदी संदेश पाटील,वेश्वी शाखा प्रमुख पदी रोहन कडू, उलवे सेक्टर 5,6 शाखा प्रमुख पदी प्रसाद पाटील, जासई विभाग प्रमुख पदी वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मुख्यमंत्री कोअर कमिटीमधील सदस्य रूपेश पाटील, उरण विधानसभा संघटक -कृष्णा पाटील,जेष्ठ शिवसैनिक मनोज घरत, उलवे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील, वहाळ ग्रामपंचायत संघटक रामदास पाटील तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.नाना गडकरी- यांनी महाराष्ट्र गीत तर कवी पुंडलिक म्हात्रे यांनी आपल्या गीतातून स्थानिक भूमीपुत्रांच्या व्यथा मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याचे प्रास्तविक कृष्णा पाटील यांनी, सुत्रसंचालन जयदास ठाकूर (वेश्वि ) तर आभार प्रदर्शन अतिष ठाकूर यांनी केले.