माई महिला बचत गटाच्या स्टॉलला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट

0

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील माई महिला बचत गटाने नाशिक येथील कृषी प्रदर्शनात लावलेल्या स्वादिष्ट लोणच्याच्या स्टॉलला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत या बचत गटाची प्रशंशा केली.

         आश्वी खुर्द येथील माई महिला बचत गटाने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगती साधली आहे.संगमनेर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी तसेच संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे माई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.शोभना प्रकाशराव सोनवणे यांनी सांगून या बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे लोणचे, गावरान तुप विविध ठिकाणच्या कृषी प्रदर्शनात ठेवले जाते.नाशिक येथील कृषी प्रदर्शनात माई महिला बचत गटाने ठेवलेल्या स्टॉलला नुकतीच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली व बचत गटाने बनवलेल्या वेगवेगळ्या स्वादिष्ट लोणच्या बद्दल माहिती जाणून घेतली तसेच बचत गटाच्या अध्यक्षा सौ.शोभना प्रकाश सोनवणे यांना व गटात असणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे   कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here