माढ्यात महायुतीला झटका,  बबनराव शिंदेंच्या लेकाला पाठिंबा!

0

माढा (सोलापूर) : माढा विधानसभा लढण्याची इच्छा असलेले परंतु उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी अखेर भूमिका स्पष्ट केली आगे. त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या निर्णयाने माढ्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील, महायुतीकडून अजित पवार गटाच्या मिनल साठे तर माढ्याचे विद्यमान अपक्ष आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवाजीराव सावंत नाराज होते, अखेर भूमिका स्पष्ट

महायुतीकडून माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळेल, यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत प्रयत्नशील होते. परंतु महायुतीने उमेदवारी न दिल्याने ते प्रचंज नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली होती. अखेर तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी आपले पत्ते ओपन केले आहेत.

शिवाजी सावंत यांचा रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा, माढ्याची निवडणूक निर्णायक वळणावर

माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना शिवाजीराव सावंत यांनी पाठिंबा दिल्याने माढ्याची निवडणूक निर्णायक वळणावर जाणार आहे. शिवाजीराव सावंत यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा याकरिता तिन्ही उमेदवारांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यंदाच्या विधानसभेला आपले वजन आमच्या पारड्यात टाका, अशी विनंती तिन्ही उमेदवारांनी शिवाजीराव सावंत यांना केली होती. परंतु त्यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवली होती.

शिवाजीराव सावंत यांच्या पाठिंब्याने माढ्याचं राजकारण बदललं

शिवाजीराव सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू आहेत. माढा तालुक्यात गेल्या तीस वर्षापासून ते समाजकारण आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. कारखानादारीच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here