होणेश्वरदेव गोविंदा पथक बोरी ने फोडली दहीहंडी.
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष ) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांनी सुरु केलेली दहीहंडीची परंपरा आजही कायमस्वरूपी सुरु असून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील पालवी हॉस्पिटल समोर भव्य दिव्य असे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उरण तालुक्यातील व उरण तालुक्या बाहेरील विविध गोविंदा पथकाचा उत्तम प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.उत्तम नियोजन व आयोजन असल्यामुळे हा उत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष घरत,उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत, नेते प्रदीप तांडेल,विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे,जिल्हा सरचिटणीस आनंद भिंगार्डे, जिल्हा सरचिटणीस चेतन म्हात्रे,जिल्हा सरचिटणीस संतोष म्हात्रे,जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान म्हात्रे,महिला तालुकाध्यक्ष हेमांगी पाटील,तालुका उपाध्यक्ष राजेश भोईर,तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर,तालुका युवक अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मंगेश कांबळे,शिक्षक नुरा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या दहीहंडी कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई उपाध्यक्ष प्रमोद बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, डॉ सत्या ठाकरे, प्रसिद्ध युट्युबर पायल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुकाध्यक्ष सीमा घरत आदी विविध मान्यवरांनी भेट देऊन सदर कार्यक्रमाचे व आयोजनाचे कौतुक केले.सदर दहीहंडी उरण बोरी येथील होणेश्वरदेव गोविंदा पथक यांनी फोडली. सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.