वडगांव निंबाळकरच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी हनुमंत पानसरे यांची निवड. 

0

बारामती : वडगांव निंबाळकर Vadgaon Nimbalkar ता बारामती येथे दि. 30/11/2023 रोजी महिलासभा तसेच ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेतील विषयांपैकी एक विषय तंटामुक्ती अध्यक्ष निवड करणे या वर चर्चा करून सर्वानुमते हात वर करून मतदान घेण्यात आले . यामध्ये बहुमताने हनुमंत तुकाराम पानसरे यांची निवड करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी एकुण सात अर्ज आले होते.यात सामोपचाराने निर्णय घेत पानसरे यांची निवड करण्यात आली. 

या ठिकाणी एक गोष्ट नमुद करण्याजोगी आहे ती म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष निवड करणे, काही ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष निवड खुप प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते व त्यासाठी गावातील गटागटात तंटा होतो असे आपण पाहिले किंवा ऐकले असेल पण वडगांव निंबाळकर येथे अशा कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देता सर्व ग्रामस्थांनी एक विचाराने कोणताही वादविवाद न करता या पदाची निवड केली, हि गोष्ट अधोरेखित होत आहे.

या निवडीने गावचे सरपंच सुनिल ढोले यांनी सर्वाचे आभार मानले, असाच एक विचार गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र दाखवावा अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारे गावात एकोपा एक विचार व्हावा व गावाचा विकास व्हावा असेही त्यांनी मत व्यक्त केले.याप्रसंगी ग्रामपंचायत सर्व सदस्य, तसेच सुनिल खोमणे अध्यक्ष आद्यक्रांतिवीर उमाजी राजे प्रतिष्ठान. जितेंद्र पवार जाणता राजा प्रतिष्ठान. भैय्याराजे उर्फ राजेश्वर राजेनिंबाळकर, 

सचिन गायकवाड, निलेश साळवे, सचिन साळवे, हरीभाऊ आगम, सोनू राऊत, बापू पानसरे, माजी तंटामुक्ती अध्यक्षा माया मिलिंद साळवे अक्षय बालगुडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किरण पानसरे पप्पु पानसरे, किशोर पानसरे, बापू पानसरे, आण्णा जाधव अभिजीत साळवे, संजय घाटे, विजय दरेकर, संदिप दरेकर, मनोज साळवे, सचिन प्रशांत दरेकर, कल्याण गायकवाड, माणिकराव गायकवाड, संजय निंबाळकर, सौरभ दरेकर संपत पापळ. ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here