वडगांव निंबाळकर येथे महिला सभा व ग्रामसभा संपन्न.

0

विविध विषयांवर एकत्रित चर्चा व सामंजस्याने सर्व विषयांवर मार्ग काढत गावाचा विकास करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय.

बारामती: वडगांव निंबाळकर ता बारामती येथे दि. 30/11/2023 रोजी महिला सभा तसेच ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी मागील सभेच्या कामकाजाचा वृ्तांत (प्रोसिडिंग) वाचून कायम करणे. सन २०२४/२०२५ च्या अंदाजपत्रकाचे वाचन करणे व मंजुरी घेणे.यावर चर्चा करण्यात आली

या सभेत एक विशेष ठराव करण्यात आला आला तो म्हणजे मोदी आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी ओबीसी समाजाच्या लाभार्थीची निवड करणे. तसेच ऐनवेळी मा.अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये गावातील ग्रामस्थांनी गावातील गायराणातील अतिक्रमण, बेकायदेशीर प्लाॅटिंग, तसेच बर्‍याच वर्षांपूर्वी बांधकाम केले आहे पण अजून नोंदी केलेल्या नाहीत अशा गोष्टींवर लक्ष वेधले. याच बरोबर गावातील मंदिरे त्यावर असणारे ट्रस्टी ते कोण आहेत, कधीपासून आहेत त्यांचे आॅडिट झाले आहे का? अशा गोष्टींवरही ग्रामस्थ आवाज उठवताना दिसले.

ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिल ढोले यांनी तसेच दत्तात्रय तात्याबा चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी (क्लार्क) यांची ग्रामसभेसाठी कार्यालयीन आदेशानुसार तात्पुरते सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती, दत्तात्रय चव्हाण यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.यावर ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेने तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. एकुणच खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here