वैद्यकीय तपासण्यांसाठी जामिनाची मुदत वाढवण्याची अरविंद केजरीवालांची विनंती

0

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाचा कालावधी 7 दिवस वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आप नेत्या आतिशी यांनी दुजोरा दिला आहे.

या पोस्टमध्ये आतिशी म्हणाल्या की, “ते (अरविंद केजरीवाल) ईडीच्या ताब्यात होते त्यावेळी त्यांचं सात किलो वजन कमी झालं होतं. अचानक वजन कमी होणं, डॉक्टरांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. जामीन मिळाल्यानंतर आणि डॉक्टरांच्या निगराणीत राहूनही त्यांना वजन वाढवण्यात यश मिळत नाही. प्राथमिक तपासणीत त्यांच्या कीटोनची पातळी वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

आतिशी म्हणाल्या की, किटोन पातळीसह अचानक वजन कमी झाल्यानं कॅन्सर आणि किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

त्यामुळंच डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना संपूर्ण शरिराचं पीईटी स्कॅनसह इतर चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यांना सप्रीम कोर्टानं निवडणूक प्रचारासाठी 2 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here