उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी यांच्या नियुक्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ग्राहक संरक्षण कक्ष उरण तालुका संघटक पदी धीरज बुंदे, तालुका सहसंघटक पदी चेतन म्हात्रे व उरण शहर संघटक पदी संदीप जाधव यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व संघटना वाढीस व बांधणीसाठी कामाला लागावे आशा सूचना दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली बुंदे उपस्थित होत्या.