सचिन आहेर यांचा मंत्री छगन भुजबळ पुरस्कृत सभापती निवड बैठकीवर बहिष्कार

0

मराठा आंदोलक आहेर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक

येवला प्रतिनिधी 

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार झालेल्या सभापती निवडीवर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचे कट्टर समर्थक विद्यमान संचालक सचिन आहेर यांनी बहिष्कार टाकला आहे. कारण गेले अनेक दिवसांपासून मनोज जारांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता आंदोलने करत आहे मात्र मराठा समाज्याला आरक्षणाचा तोंडी घास आला असतांना मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी दोन समाज्यात तेढ निर्माण करण्यासाठी खालच्या पातळीवर राजकारण करून येवल्यासह महाराष्ट्रभर मराठा समाज्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले,तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा  आंदोलक मनोज दादा जारांगे यांना विरोध करतांना म्हटले होते कि, येवल्यातील मराठा समाज माझ्या सोबत आहे,मात्र त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रभर तणमन धनाने आंदोलन करत असलेल्या मराठा समाज्यासह मनोज दादा जारांगे यांना खाली पाहण्याची वेळ आली आहे.

म्हणून मी राज्यातील मराठा आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ पुरस्कृत बैठकीवर बहिष्कार टाकला,मात्र माझ्या मनात कोणत्याही समाज्याविषयी कटूता नसुन, कोणाच्या भावना दुखावन्याचा हेतू नाही.म्हणूनच मी भुजबळांच्या आदेशानुसार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सभापती निवडीच्या बैठकी वर विद्यमान संचालक असूनही गेलो नाही,पण नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या आहेत असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here