समृद्धी महामार्गावरील टोलचे दर सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. त्यामुळे समृद्धीवरून जाण्याऐवजी जुन्या मार्गानेच जाणे लोक पसंत करतील. किंवा विमानानेही जास्त लवकर जाता येईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.
समृद्धी महामार्गावरील टोलचा मुद्दा उपस्थित करताना पाटील म्हणाले, “या प्रकल्पात मोठी गुंतवणूक झाली आहे. मात्र, याठिकाणी टोल इतका कसा, हे आम्ही मुख्यमंत्री आणि या खात्याच्या मंत्र्यांना विचारू, त्यांचे उत्तर योग्य नसेल तर मी त्याविरोधात आवाज उठवणार आहे.”
राज्य सरकारने या टोलबाबत स्वतः विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. याविषयी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका मांडणार आहोत, असंही पाटील यांनी म्हटलं.