12 जानेवारीला उरणमध्ये बेरोजगार युवकांचा मेळावा.

0

उरण दि.3 (विठ्ठल ममताबादे) जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकऱ्या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.कॉ.भूषण पाटील,सुधाकर पाटील,संतोष पवार,दिनेश घरत,राजेंद्र मढवी,प्रमोद ठाकूर,जितेंद्र ठाकूर,शेखर पाटील, अरविंद,चेतन गायकवाड,प्राध्यापक राजेंद्र मढवी,जागरकर्ते रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या बैठकीत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त  राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी 2023 रोजी मल्टीपर्पज हॉल, टाऊनशिप, उरण येथे दुपारी 3 वाजता बेरोजगार युवकांचा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला.या मेळाव्यासाठी प्रकल्पबाधित (सेझ )बेलपाडा, करळ, सावरखार,सोनारी,जसखार या गावाच्या सेझ कमीट्या व सर्व सरपंच आणि इच्छुक सर्वपक्षीय नेते मंडळीना बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.हे सर्व बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेंव्हा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी केले आहे.

रण तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजे. पैसे घेउन नोकरी लावणाऱ्यांची दलाली बंद झाली पाहिजे. उरण मधील स्थानिक तरुणांना एक रुपयाही न भरता नोकरी मिळाली पाहिजे यासाठी युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने 12 जानेवारी 2023 रोजी जेएनपीटी टाऊनशिप येथे बेरोजगार युवकांचा मेळावा आयोजित केला आहे.

-एल बी पाटील

जेष्ठ साहित्यिक, उरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here