आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझावर रफामार्गे होणारे आक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.पॅलेस्टिनी लोकांना असणारा धोका लक्षात घेऊन इस्रायलने इस्रायलने रफाहमधील लष्करी आक्रमण आणि इतर कारवाया ताबडतोब थांबवल्या पाहिजेत, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. इस्रायलतर्फे गाझामध्ये केल्या जाणाऱ्या कारवायांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर बराच खल होत आहे. आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेनने 28मे पासून पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याची घोषणा केली होती.
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जातोय. इस्रायलसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने लष्करी कारवाई थांबवण्यासोबतच खालील आदेश दिले आहेत.
- *रफामधील लष्करी कारवाई थांबवा
- *मानवतावादी मदत गाझात पोहोचावी यासाठी इजिप्तला लागून असलेली रफा सीमा खुली करा
- *शोधकार्य आणि मदत पोहोचवण्यासाठी जाणाऱ्यांचा मार्ग खुला करा
- *एक महिन्याच्या आत या उपाययोजना लागू करण्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करा