येवला प्रतिनिधी
येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त हुतात्मा स्मारक, येवला येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
यावेळी हुतात्मा स्मारक परिसराची काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साफसफाई केली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोधंळी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शशिकांत गुळसकर, अॅड. सुदाम कदम, बळीराम शिंदे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, नंदकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे, अनिल तरटे, उमेश कंदलकर, आबासाहेब शिंदे, एन.एस.यु.आय तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, राजेंद्र गणोरे, राजेंद्र घोडके, अझर शहा, किशोर काळे, नारायण भांडगे, अशोक नागपुरे, मुसा शेख, दिपक पाटोदकर, सुधीर लभडे, अशपाक अन्सारी, सुनील काळे, प्रकाश भोरकडे, नितीन जोशी, रविंद्र थळकर, सचिन वारे, नंदकुमार कवडे, अविनाश घायदंड, गोरख काळे, भगवान शेवळेकर, शिवाजी पवार, सुयश धारक, शिवेंद्रादितय देशमुख, कृष्णा सोमासे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.