फलटण प्रतिनिधी. :
विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 9 मे रोजी सायंकाळी पाच वाजता मधोजी क्लब मैदान, फलटण येथे विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना। शंभुराजे देसाई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आमदार श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घारगे , निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रामराजे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यापैकी शेतकरी मेळावा, मॅरेथॉन, सायकल स्पर्धा, भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धा, छ.संभाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा वगैरे संपन्न झालेले आहेत. सोमवार दि. 8 मे रोजी संध्याकाळी खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. मंगळवार दि. 9 मे रोजी चांदीच्या अमृतकुंभामध्ये कृष्णाचे पवित्र जल देऊन जल तुला करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जयंत ग्रुप फलटण यांच्यावतीने ग्रंथतुला व धान्यतुला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार दीपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे