बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या दौंड शहर प्रमुखपदी श्रीनाथ ननवरे तर उपशहरप्रमुखपदी सोमनाथ दिवटे 

0

दौंड तालुका प्रतिनिधी (रवि देसाई): बाळासाहेबांची शिवसेना चे मुख्य नेते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी .मंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशावरून व बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या सहीने दौंड शहर प्रमुखपदी श्रीनाथ माणिकराव ननवरे तसेच बाळासाहेबांची शिवसेनेच्या दौंड उपशहरप्रमुखपदी सोमनाथ दिवटे यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

     हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिदूत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांच्या आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून  तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य करत तसेच राज्य व केंद्र सरकारच्या  विविध योजनांचे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे महिला व युवकांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, गरीब गरजू रूग्णांना उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्रीनाथ ननवरे व सोमनाथ दिवटे यांनी संयुक्तरित्या माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here