बुलडाणा, (प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची २९ जानेवारी २५ रोजी बुलडाणा येथील चिखली रोड वरील हॅाटेल नर्मदा येथे बुलडाणा जिल्हा दक्षिण (घाटावरिल) कार्यकारणी पदाधीकारी कार्यकर्यांची बैठक आयोजीत केली होती या बैठकीचे अध्यक्ष बुलडाणा रिपाई जिल्हाध्यक्ष इंजिनियर शरद खरात होते. या बैठकीत विविध राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली व पूढील रिपाईच्या ध्येय धोरणावर विचार मंथन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष इंजिनियर शरद खरात यांनी बुलडाणा निवासी नबाब मिर्झा बेग हे गेल्या विस वर्षापासून स्मृतीशेष रिपाईचे अध्यक्ष देवीदासजी साबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपाई आठवले गटात सक्रीय आहेत. त्यांनी सर्वजाती धर्माचे कार्यकर्ते रिपाई आठवले गटा मध्ये कार्यकर्ते अनण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा जिल्हाभर अल्पसंख्य समाजात घननिष्ठ संबंध आहे. त्यांच्या या संबंधचा रिपाई पक्षाला मोठा फायदा होईल ते केंद्रीय सामाजीक न्यायराज्यमंत्री भारत सरकार तथा रिपाई राष्ट्रीयध्यक्ष डॅा. रामदाजी आठवले यांचे वर जिवापाड प्रेम करणारे एकनिष्ठ आहे.
या एकनिष्ठतेचा व त्यांच्या संघटन कौशल्याचा, त्यांच्या वैयक्तिक इतर समाजासी असलेल्या संबंधाचा विचार करून “ नबाब मिर्झा बेग “ यांची बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाच्या दक्षिणच्या “ अल्पसंख्य आघाडी जिल्हा प्रमुख पदी “ आजच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली व त्यांचे जिल्ह्याध्यक्ष इजि. शरद खरात यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुष्पमाला घालून स्वागत केले व पूढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीतील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्हाभरातून त्यांचे वर आभिनंदनाचा वर्षाव होत आहे.