पैठण,दिं.९: रामनगर प्रभाग क्रमांक दोन मधील नाथविहार वसाहत मध्ये रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा युवानेते विलास भुमरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून रामनगर नाथविहार येथे वसाहत मध्ये जाणा-या दोन अंतर्गत रस्त्यांचे कामे सुरू आहेत.
सदरील कामास माजी नगरसेविका सविता निवृत्ती माने पाटील, निवृत्ती(बाळू) माने यांनी सदरील वसाहती मधील रस्त्यांसाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या कडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रीमहोदय यांनी रामनगर प्रभागास भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून सध्या पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काॅट्रॅक्टर नितीन देशमुख हे कामे दर्जेदार करीत असून नाथ विहार वसाहत मध्ये रस्ता चांगला होत असल्याने रामनाथ शिंदे, डॉ संदीप शिरवत, भिमराव लोहारे,एस एम शिसोदे, माजी सरपंच बाबुराव खाटीक पाटील,अॅड सुभाष खडसन,अॅड राजेंद्र गोर्डे,अॅड पटवर्धन, मनोज पल्लोड, प्राचार्य सुरेश पाटील, भाऊ निवारे, अमोल कुलकर्णी, तुळशीराम शिंदे, सुभाष लोंढे, रमेश जाधव, सुधीर जाधव, सुनील कंठाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
——–
निवृत्ती(बाळु) माने पाटील : पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील, युवानेते विलास बापु भुमरे पाटील यांच्या माध्यमातून पैठण शहरात कोट्याधी रूपयांचा निधी आलेला असून त्यातच प्रभाग क्रमांक दोन मध्ये मंत्रीमहोदय यांनी खुप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने दर्जेदार विकास कामांना सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक दोनचा चेहरा मोहरा बदलणार आहे.