शहापुर गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र सकटे यांची बिनविरोध निवड

0
फोटो : उपसरपंच राजेंद्र सकटे यांचा सत्कार करताना चंद्रकांत खंडाईत शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : शहापूर, ता.सातारा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र गुलाबराव सकटे यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली आहे. निवडीनंतर रिपब्लिकन सेनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

    नव्या दमाची ग्रामपंचायतीमध्ये टीम निवडून आल्याने गावातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा-विनिमय करण्यात आला.संपूर्ण गावासाठीच स्मशानभूमीचे प्रथमतः हाती काम घेणे. गावांतर्गत व सार्वजनिक रस्ते पक्क्या स्वरूपात करणे. याशिवाय,वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या टीमने सांगितले.

       यावेळी सरपंच मधुकर माने, सदस्य- किरण माने,शरद सकटे, सौ.सारिका नवनाथ माने, सौ. सुनीता अरूण गायकवाड,सौ. कोमल श्रीमंत माने,उषादेवी राजेंद्र माने व माजी सरपंच शंकर सकटे, हेमंत माने,चेअरमन प्रतिक माने,संचालक नवनाथ माने,लालासो सकटे,शंकर माने, संतोष माने, माजी उपसरपंच सतिश माने, दीपक सकटे,ऋषी जाधव, सनी सकटे,तुकाराम सकटे, सचिन सकटे,सिताराम सकटे, ग्रामसेवक प्रवीण जाधव, निरीक्षक युवराज गायकवाड,गाव कामगार तलाठी पेंडसे अण्णा आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here