हाडांचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न 

0

उरण दि. 22( विठ्ठल ममताबादे) : सध्याच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या, युगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक ठिकाणी नागरिकांना हाडांचे, सांधेदुखीचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे.ही नागरिकांची आरोग्याची समस्या लक्षात घेऊन मशिनीच्या सहाय्याने नागरिकांचे हाडांचे खनिज घनता,सांधेवात , सूजचे परिक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आले. व औषधे देण्यात आली.

उरण तालुका काँग्रेस कमिटी,काँग्रेस शहर कमिटी व सागीस वेलनेस कंपनी विक्रोळी मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने काँग्रेस कार्यालय, देऊळवाडी, उरण शहर येथे हाडाचे आरोग्य शिबीराचे आयोजन दि.22/12/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे , शहर अध्यक्ष प्रकाश पाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, सागीस वेलनेस कंपनीचे डॉ सचिन माने, डॉ साक्षी माने, कॅम्प मॅनेजर प्रशांत क्षीरसागर, टेक्निशियन -राजाराम दिघे, हर्ष दिघे उपस्थित होते.

आर्थराईटिस हा आजार म्हणजे सांधे वात व सूजेचा प्रकार येणे आहे. सांधेदुखी म्हणजे सांध्यातील उतींची पुनर्निर्मिती थांबणे. त्यांचे अखडणे, सूज येणे आणि उठताना बसताना चालताना सांध्यामध्ये कळ येणे. ही आर्थराईटीस या आजाराची लक्षणे आहेत यामूळे शरिराची हालचाल बंद होउ शकते. तर हाडांची खनिज घनता कमी झाल्याने ऑस्टियोपोरोसीस हा आजार होतो.शांतपणे जीव घेणारा रोग म्हणून हा आजार ओळखला जातो.  जगातला हाडांशी हा संबंधित सर्वात मोठा रोग आहे. हा रोग लवकर म्हणजे 25 व्या वर्षी सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हांडाची आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ सचिन माने यांनी सांगितले. उरण तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व सागीस वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हाडांच्या आरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here