देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
देवळाली प्रवरा येथिल भंगार दुकाना शेजारील वेड्या बाभळीच्या काट्यांनी पेट घेतल्याने भंगार दुकाना शेजारी असेल भंगार मालातील टायर व इतर साहित्य पेटल्याने आगिचे डोंब उठले.भंगार दुकान चालकाचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.माञ सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.भर दुपारी आग लागल्याने आग विझविण्यास अडचणीचा सामना अग्निशमन कर्मचाऱ्यांना करावा लागला.
याबाबत सविस्तर माहिती अशी येथिल भंगार दुकाना शेजारील काटवानात अज्ञात व्यक्तीने काट्या पेटवुन दिल्याने भंगार दुकाना शेजारील टायर, ठिबक सिंचन पाईप व इतर फायबर वस्तू यात जळुन खाक झाल्या. देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने तीन बंबाचा वापर करुन आग अटोक्यात आणली.आग विझविण्यासाठी भारत साळुंखे,सोमनाथ सुर्यवंशी,बबन दिवे,संतोष औसरकर, अशोक पंडीत, भाऊसाहे बर्डे,विशाल खलसे, नितीन सरोदे, शांतावन संसारे,किशोर सरोदे,विकास गडाख, असलम इनामदार,धाकतोडे आदींनी आग विझविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.