सातारा : महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे – पाटील या एकीकडे अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत आहेत.महाबळेश्वर महसुल यंत्रणा ही किती जनजागृत आहे याचे धडे तालुक्यातील धनदांडग्यांना देतात तर दुसरीकडे अशा प्रकारे मौजे भोसे – भिलार मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांना पाठबळ देतात.तेंव्हा त्याबाबत स्पष्ट खुलासा करावा.
याबाबत अनमोल कांबळे म्हणतात, “तहसीलदारांना एकच प्रश्न आहे की, मॅडम जर का तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात तर मग तुम्ही भोसे येथील कार्यरत असणाऱ्या मोहिते मॅडम तलाठी यांना या बांधकामावरती कारवाई करण्यासाठी का थांबवता ? तक्रार केल्यानंतरही मोहिते मॅडम आम्हाला सांगतात की, तहसीलदार मॅडमचा प्रेशर आहे. या बांधकामावरती जायचं नाही. अशी कुठली शक्ती आहे ? जी या महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदारांना या बांधकामावरती कारवाई करण्याकरिता रोखत आहे. त्या शक्तीच फळ काय आहे ? ते जाहीर करा. म्हणजे आम्हालाही आणि जनतेला ही कळेल की, आपण खरोखर लोकांची कामे करता की तोंडे बघून कारवाया करता आहात ?”