कॉंग्रेस पक्षातर्फे येवला तालुक्यात रहाडी येथुन जनसंवाद यात्रेची सुरुवात.

0

येवला प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ३ सप्टेंबर २०२३ पासुन जनतेच्या प्रश्नावर जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे येवला तालुक्यातील पूर्व भागातील रहाडी गावातून जनसंवाद यात्रेस सुरवात झाली. 

        मोदी सरकारचे काळात महागाई प्रचंड वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, एलपीजी गॅस, खाद्य तेल, डाळी, यासह सर्व जिवानशयक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. शेतीला लागणारे साहित्य, खते, बियाणे यांचे किंमती मात्र चौपट वाढलेल्या आहेत. शेतमालाला भाव नाही परंतु वीज दरवाढ मोठया प्रमाणात झाली आहे. यासह ईतर प्रश्ना संदर्भात जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. जनसंवाद यात्रा संपूर्ण तालुक्यातील गावात व संपूर्ण येवला शहरात जाणार असून लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत.

       जनसंवाद यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी, निवृत्ती लहरे, अशोक भागवत, बळीराम शिंदे, तालुका उपाध्यक्ष मारुती सोमासे, चांगदेव सोमासे, बाबासाहेब शिंदे, भाऊराव दाभाडे, शिवनाथ खोकले, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे, दिपक साळवे, दत्तु भोरकडे, एन.एस.यु.आय तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, श्रावण राजगिरे, बाबासाहेब पगारे, श्रुषीकेश  सोमासे, रोहन बिडवे, गणेश सोमासे, अशोक नागपुरे, माधव सोमासे, रहाडीचे सरपंच मच्छिंद्र महाजन, गोकुळ भोगांळ, इरफान शेख, श्रावण राऊत, आनंद रोकडे, वैभव रोकडे, अरबाज शेख, प्रेम वाघ, प्रफुल्ल त्रिभुवन, रोहित रोकडे, राजु शहा, नानासाहेब भोगांळ, अमजद शेख, अल्ताफ पठाण, सलमान शेख  बादशहा शेख, नितीन गायकवाड, साईनाथ ढोकळे, वाल्मिक सोमासे, सचिन सोमासे, शिवेंद्रादितय देशमुख आदींसह रहाडी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here