❂ दिनांक :~ 04 मार्च 2023 ❂ 🎴 वार ~ शनिवार 🎴
*🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन. 04 मार्च
तिथी : शु. द्वादशी (शनि)
नक्षत्र : पुष्य,
योग :- शोभन
करण : कौलव
सूर्योदय : 06:53, सूर्यास्त : 05:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌उथळ पाण्याला खळखळाट फार.
🔍अर्थ:-
अंगात थोडीशी कुवत असूनदेखील जास्त दिमाख दाखवणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
◼️औद्योगिक सुरक्षा दिवस
🌞या वर्षातील🌞 63 वा दिवस आहे.
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
👉१८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले
👉१८३६: शिकागो शहराची स्थापना झाली.
👉१९६१: भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
👉१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
👉१९८४: महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
👉१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
👉२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
👉१९२२: दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
👉१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
👉१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
👉१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
👉१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
👉१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
👉१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
👉१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
👉१९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
👉१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
👉२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
👉२००७: सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
👉२०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉एकमत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे?
🥇दुमत
👉साबण हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतुन आला आहे?
🥇पोर्तुगीज
👉महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणाचे आहे?
🥇आ.विनोबा भावे.
👉भैरोसिंग शेखावत यांनी देशातील कोणते उच्चपद भुशविलेले आहे?
🥇उपराष्ट्रपती पद
👉टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो?
🥇लायकोपिन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸
👨👦वडीलांची पुण्याई
पंडीत रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्य करण्यात अग्रेसर होते. पंडीतजींची कमाई स्वत:वर कमी आणि दुस-यावर जास्त खर्च होत होती. एकदा पंडीतजींच्या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्या लोकांनी पंडीतजींना संध्याकाळच्या गाडीची तिकिटे काढण्यास सांगितले. त्यादिवशी पंडीतजींकडे काहीच पैसे नव्हते. याबाबत पाहुण्यांकडे ते काहीच बोलले नाही. त्यांनी आपल्या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्यात खेडवळ वाटणारा वयस्कर माणूस त्यांच्याकडे आला व म्हणाला,” रामप्रसाद पंडीत आपणच का,” रामप्रसाद होय म्हणाले असता, वयस्कर माणसाने त्यांना त्यांच्या वडीलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्हणताच त्या माणसाचे डोळे भरून आले व तो म्हणाला,” बेटा, वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्यावेळी तुझ्या वडीलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्यास मी आलो आहे. त्यावेळी त्यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पाहूच शकलो नसतो. त्यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्यांचे पैसे एकत्र केले पण त्यांच्या निधनाची वार्ता मला समजली म्हणून तेव्हा जमले नाही तर आज स्वत: ते पैसे परत करण्यास मी आलो आहे.” असे म्हणून त्याने ते पैसे पंडीतजींना दिले व एकहीक्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली व ईश्वराचे आभार मानले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏🌹श्री. देशमुख. एस. बी,
🌻सचिव🌻
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
📱7972808064📱
सेक्रेटरी -बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर 🌹🙏मुख्याध्यापक पाताळेश्वर विद्यालय पाडळी🌹 सचिव , प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे .
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸