वाई प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून यशवंत नगर मधील पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि पाणीपुरवठा विद्यमान तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष गणेश दत्तात्रय सावंत यांच्यामुळे बंद राहणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती या पोस्ट नंतर यशवंत नगर ढवळून निघाले होते
याबाबत अधिक माहिती अशी की व्हायरल पोस्ट नंतर गणेश सावंत यांनी खुलासा पोस्ट प्रसिद्ध केल्याने पाणीपुरवठा गणेश सावंत यांनी बंद केलेला नाही तर प्रसिद्ध पोस्ट राजकीय हेतूने प्रसिद्ध केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे पाणीपुरवठा ही गणेश सावंत यांना बदनाम करण्यासाठी खंडित केला असल्याचे मत काही ग्रामस्थांनी मांडले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून एकमेकांच्या विरोधात यशवंतनगर ग्रामपंचायत या मध्ये आरोप प्रत्यारोप याचा कलगीतुरा रंगला आहे की काय? राजकारणामुळे ग्रामस्थांना वेटीस धरले जात आहे अशा चर्चांना ही उधाण आले आहे त्यामुळे गणेश सावंत यांना बदनाम करून विरोधाचे बदनामीचे राजकारण केले जात आहे का? खंडित पाणीपुरवठा कि राजकारणाचा खेळ मोठा?