रावणगावसह इतर पाच गावाना मिळणार पूर्ण दाबाने पाणी 

0

दौड-रावणगाव, परशुराम निखळे :

खडकवासला धरण कालव्यावर मळद (ता.दौंड) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आउटलेट मधून ओढ्याला पाणी सोडण्यात आल्याने रावणगाव सह मळद, नंदादेवी, खडकी या बरोबर स्वामी चिंचोली या पाच गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या मागील पंधरा वर्षाच्या मागणीला अखेर यश आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले

           

रावणगाव परिसरातील शेतीला खडकवासला धरण कालव्यावरील ३२ ते ३५ या तीन फाट्याद्वारे पाणी सोडले जाते या मधून रावणगाव मळद, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली या गावांना पाणी दिले जाते मात्र उन्हाळ्या मध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्यास टेल पर्यंत पाणी पोहोचण्यास अडथळा येत होता परिणामी पिके जळुन दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते मागील पंधरा वर्षांपसून या भागातील शेतकऱ्यांची ओढ्यावर आउटलेट करा अशी मागणी होती 

           

आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून मळद येथे राज्य शासनाच्य वतीने ५४ लाख रुपये खर्च करून खडकवासला धरण कालव्यावर मळद येथे आउटलेट बांधण्यात आली या मधून शुक्रवार दि.२८ रोजी ओढ्याला पाणी सोडण्यात आले शनिवारी पाणी शेवटच्या टोका पर्यंतच्या स्वामी चिंचोली परिसरात पोहचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यामुळे ओढ्यावरील जवळपास विस बंधारे पाण्याने पूर्ण दाबाने भरणार आहेत ओढ्याला आलेल्या पाण्याचे रावणगाव ग्रामस्थांनी पुजन करीत जल्लोष केला 

रावणगाव परिसरातील बहुतांश शेती उपसा सिंचन योजनेमुळे ओढ्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मळद, नंदादेवी खडकी यासह स्वामी चिंचोली गावांना नेहमी पाणीपुरवठा कमी होत होता आमदार राहुल कुल यांच्या दूरदृष्टी धोरणाने शेतकऱ्यांचा अनेक वर्षाच्या मागणीला यश आले. अरूणराव आटोळे भाजपा कीसान मोर्चा दौड तालुका अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here