उरण दि १५(विठ्ठल ममताबादे ) : अक्षय भालेराव याच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर करण्याची बौद्धजण पंचायत समिती उरण तर्फे मागणी करण्यात आली आहे.मु. गाव बोंढार, ता. हवेली, जि. नांदेड, महाराष्ट्र या गावातील अक्षय भालेराव यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केल्यामुळे गावातील इतर समाजातील काही गावगुंडांनी या बौध्द तरूणाला रस्त्यावर पकडून मारहाण करून त्याची निघृणपणे हत्या केली आहे. तरी सदर प्रकरणी या गावगुंडांच्या विरोधात जलद न्यायालयामध्ये केस दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ८४३ उरण बौध्दवाडीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे,पदाधिकारी हरेश जाधव, हरिश्चंद्र गायकवाड, विनोद कांबळे, अखिलेश जाधव यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.