उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन  केणी

0

उरण दि 5(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दैनिक पुण्यनगरी, रामप्रहरचे  प्रतिनिधी  जीवन गोपाळ केणी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून, सचिव पदी कृषिवलचे वार्ताहर  दत्तात्रेय अनंत  म्हात्रे तर उपाध्यक्ष  म्हणून दैनिक नवे शहरचे दिनेश नामदेव  पवार यांची निवड  5 जून 2023 रोजी 11:00 वाजता  उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीचे पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुछ देऊन  अभिनंदन करण्यात आले.यावेळी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष दैनिक सामना, लोकमतचे प्रतिनिधी व  कार्यकारिणी सदस्य मधुकर ठाकूर,दैनिक सागरचे  प्रदीप पाटील, दैनिक लोकसत्ताचे जगदीश तांडेल, सामनाचे  सूर्यकांत म्हात्रे, रायगड टाईम्सचे अनंत नारंगीकर,पुढारीचे  राजकुमार भगत,सकाळचे महेश भोईर व आपलं महानगरचे  सुभाष कडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here