औंरगाबाद ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या चोख नियोजनामुळे “नाथ षष्ठी वाहतूक कोंडी मुक्त” !

0

पैठण,दिं.१५:पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज षष्ठी निमित्ताने  औंरगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने पाच ठिकाणी औंरगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली नसुन संत ज्ञानेश्वर उद्यान येथील पार्किंग मध्ये अंदाजे चार ते पाच हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांनी केल्याने शहरात जाणा-या दिंड्यासह भाविकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न झाल्याने वाहतूक व स्थानिक पोलिसांचे वारक-यातून कौतुक होत आहे.

    ज्ञानेश्वर उद्यान पार्कींग, शासकीय रुग्णालय, महावीर चौक, तहसील कार्यालय, सह्यादी.चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पो.नि. किशोर पवार यांना पैठण शहरातील अनुभव असल्याने छत्रपती संभाजी नगर हद्दीत पायी येणाऱ्या दिंड्या कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष मोहीम वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी रात्रंदिवस छत्रपती संभाजी नगर ते पैठण रस्त्यावर पेट्रोलिंग ठेवण्यात आली होती. यामुळे रस्त्यावर कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सुनिल लांजेवार पो. नि. किशोर पवार यांच्या मार्गदर्शन उपनिरीक्षक शशिकांत तायडे, उपनिरीक्षक मधुकर गायकवाड यांच्या सह जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बळीराम काकडे, पोहेका दत्ता मुंडे, सुखदेव लोखंडे, सचिन राठोड, संतोष राठोड, अझरुद्दीन शेख, सय्यद शेख, मेहेर, संजय तेली, सुधीर भाट, सुधीर ओव्हळ, मुकुंद नाईक, राजु संपाळ, शैलेश जेजुरकर, कोळेकर, संतोष गिरी, सुर्यकांत पाटील, सुधाकर कोळेकर, श्रीकांत दांडगे सह औंरगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त कामी विशेष परिश्रम घेतल्याने वाहतुकीची पैठण शहरात कोंडी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here