उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) नाट्यवेद नाट्य संस्था खोपटे आणि कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )उरण यांच्या संयुक्त विद्यमाने केशव पांडुरंग म्हात्रे यांच्या ” छडीची गोष्ट” या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक ए.डी.पाटील यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाचे उदघाटन खोपटे सरपंच विशाखा ठाकूर यांनी केले.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य रायगड भूषण प्रा एल बी पाटील होते.एल बी पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षकांनी छडीचा वापर करावा किंवा याबद्दल दोन विरूध्द मते आहेत.पण आज छडीचा वापर करूच नये शासकीय मत आहे.
या विषयावर २५ वर्षे केंद्र प्रमुख असलेले एक आदर्श शिक्षक केशव म्हात्रे यांनी संपूर्ण सेवेत
जो छडीचा वापर न करता जो आदर्श घडविला ते “छडीची गोष्ट” हे उत्तम अनुभव कथन आहे.यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक ए.डी.पाटील, बंडखोर अँड.गोपाळ शेळके ,”खाडीवरची माडी” फेम गजानन म्हात्रे, कोमसाप उरणचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,न.ब.म्हात्रे, जनार्दन संतांणे, बोराडे सर यांनी आपले विचार मांडले.लेखक केशव म्हात्रे यांनी मनोगतात छडीविना सेवेचा आनंद विशद केला.ईशस्तवन गजानन म्हात्रे यांनी गायिले. तसेच विशेष म्हणजे गाऊन आभार मानले.यावेळी विकास ठाकूर, बळिराम ठाकूर,प्रणय पवार, वस्तराज ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.